Sunday, August 1, 2010

माझे मन...

                           मी लग्न करायचं तर घरच्यांच्या पसंतीनेच असं ठरवलं होतं. तुम्हाला वाटेल काय मनुष्य आहे हा! पण मी हा असाच...
आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपल्या सगळ्या मागण्या पुर्ण करतात. थोडक्यात आपणंच त्यांच सर्वस्व असतो. मग त्यांनी जर माझ्या कडून ही एक अपेक्षा ठेवली तर मी ती पुर्ण करायला नको? तुम्हीच सांगा. मी परस्पर एखादी मुलगी पसंत केली आणि ती घरच्यांच्या पसंतीस नाही उतरली, आयुष्यभर मनात हा सल राहणारच ना?  हा त्यांच्या भावनांचा अपमान नाही का? त्यामुळं सर्व संमतिनं मुलगी पसंत करायची असा सारांश. मुलीबद्दल काय अपेक्षा असायला हव्यात याचा मी नक्कीच कुणाला सल्ला विचारणार नव्हतो. मला माहिती आहे मी कसा आहे. माझ्यातले चांगले गुण आणि दुर्गुण ओळखण्याइतपत मी नक्कीच सुज्ञ आहे.
   आई शप्पथ!!! अरे आज लोकल मधून येताना शरद चा फोन आला होतं... बोलता बोलता सहज मला म्हणाला पाटील आता लग्न केंव्हा .... मग मी पण असाच विचार करू लागलो म्हटलं बघू तरी आपल्याला कसली मुलगी हवी  ......माझी मुलिंकडे बघायची नजरच बदलली. ऑफिसमधल्या, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या, घरच्यांसोबत असणाऱ्या, ग्रुप मध्ये असणाऱ्या मुली. कसा असतो त्यांचा स्वभाव? त्यांचे हावभाव, हसण्याची पद्धत, केस मागे घेण्याची लकब, कशा उठतात, कशा बसतात, कशा चालतात, बोटांचे गाडीच्या चावीशी, पेनाशी चाललेले खोडकर चाळे, दाताखाली ओठ दाबायची स्टाईल, हाताची घडी कशी घालतात, एकमेकांना टाळ्या देणे, बोलताना मध्येच डोळे मोठे करणे.. मुलींच्या सहज हालचाली टिपून घ्यायची सवयच लागली म्हणा ना! म्हटलं थोडातरी थांग पत्ता लागेल त्यांच्या स्वभावाचा! पण एव्हढं सोप्पं आहे का ते?
   कधी कधी आपली पण अपेक्ष प्रमाण बाहेर जाते...मग त्या क्रायटेरिया मध्ये बसणारी मुलगी शोधून सापडत नाही आणि पहिली बघितली जाते, मग दुसरी मग तिसरी असं करत करत मग मुलगी बघणे हा विनोद होउन बसतो. आणि नंतर वाटतं अरे यार तेव्हाच तिला हो म्हटलं असतं तर बर्र झालं असतं, पण तो पर्यंत वेळ टळून गेलेली असते.
   आणि हो मुलगी आवडलीच तर लग्न... तो एक खूप ackword सोहळा असतो... मला आवडतं पण......लग्नानंतर तिला जोब करायचा नसेल तर .... माझी काही हरकत नाही.. पण मी जर लांब कुठे तरी नोकरीला लागलो  channai सारख्या ठिकाणी तर.... तुम्हाला माहीतच आहे माझे नशीब ...मी हा असा मोठ्या कंपनीत काम करायला मिळतंय म्हणून घरापासून इतक्या लांब आलेलो, वेगळी भाषा, पुर्णपणे वेगळं कल्चर; राहणं खाणं, मेट्रो सिटी मध्ये रहायचं म्हणजे माझा एकट्याचाच कितीतरी खर्च व्हायचा. आणि मराठी मुली म्हणजे शक्यतो महाराष्ट्रातच शिक्षण आणि सहसा घरापासून जवळ नोकरी अशातल्या. सर्व काही स्थिर स्थावर आणि सासर पण सांगली , कोल्हापूर जयसिंगपूर , आपल्या भगतालाच असावं असं मनात ठेउन असणाऱ्या मुली घरापासून दोन हजार किलोमीटर दूर आल्या असत्या? येत असतीलही पण या सगळ्यावर पाणी फेरून एक्कलकोंड आयुष्य जगायला. नवरा दिवसभर ऑफिसमध्ये आणि ही घरात! सकाळी त्याला नाश्ता, डब्बा तयार करून द्यायचा; तो निघून गेला की धुणी भांडी करायची, घर साफसुफ करायचं, मग टीवी चालू करायचा त्यावर लागलेल्या मतीभ्र्ष्ट झालेल्या लोकांच्या, दर्शकांची बुद्धीभ्रष्ट करणाऱ्या मालिका, रटाळ सिनेमे, अन त्याचा कंटाळा आला की झोप काढायची. कारण अशा ठिकाणी शेजार  कसा भेटेल, असेल की नाही कुणास ठाउक? आणि नव्या ठिकाणी नोकरी करायची मानसिकता किती मुलींची असते या बाबत माझं काही स्प्ष्ट मत नाही. मग संध्याकाळी अर्धा तास नवरा घरी आला की त्याच्या सोबत भाजी वगैरे खरेदी करायला म्हणून बाहेर पडायचं, रात्री घरी यायचं स्वयंपाक पाणी, भांडी आवरायची झोपून जायचं.
   असो मी आणि माझे मन असाच भरकटत असतो..... माझे मन तर 160KM speed ने पळत असता... असे माझी मैत्रीण म्हणते...
          मी हा विचार लोकल मध्येच थांबवला आणि गुपचूप ऑफिस मध्ये येऊन काम करू लागलो ....

No comments:

Post a Comment