Sunday, January 22, 2012

रचल्या तुझ्याचसाठी...

मित्रानो... एखादी मुलगी आपल्याला पाहताच आवडते... आणि मनातल्या मनात म्हणतो... "मुझे भी ऐसीही बिवी मिले.."  आणि अशीच पाहताच आवडणारी मुलगी आपल्या सहवासात येते.. आणि आपण तिचे मान जिंकण्यासाठी, किंव्हा नकळत का होईना... आपण तिच्यासाठी बरेच काही करतो.... आणि आपली ती चांगली मैत्रीण होते.... पण आपलं मनात काही तरी त्याहीपेक्षा वेगळं चालू असतं....  आणि अचानक एके दिवशी ती आपल्या होणारया नवऱ्याला घेऊन भेटायला येते.... तेंव्हा मात्र काळीज चुरचुरत.. आणि असे काही शब्द कागदावर उमटतात....

                                                 हृदयी अनेक लाटा उठल्या तुझ्याचसाठी
                                                ग्लानीत पापण्याही मिटल्या तुझ्याचसाठी 

                                                 चाहूल लागता तव दरी वसंत फुलतो 
                                                 केसातल्या कळ्याही हि फुलल्या तुझ्याचसाठी

                                                  दिसताच तू कुणाची लागेल दृष्ठ म्हणुनी
                                                पणत्या घरातल्या बघ विझल्या तुझ्याचसाठी

                                                   केला जागी दिखावा मी धैर्यवान आहे 
                                                 तिमिरात पापण्या या ओल्या तुझ्याचसाठी

                                                  आधी कधीच नव्हतो चोर मी या जागीच 
                                                 पण काल चांदण्या मी लुटल्या तुझ्याचसाठी
                                              
                                                      हृदयात हुंदका हा दाबून ठेवलेला
                                                 ओठात हास्यरेषा फुलल्या तुझ्याचसाठी 
                                                     

मला माणसे कळतात... खरच का ??

माझं पाझरत मन .. आज असं काही पाझरू लागलंय ... वाटलं तुझ्याशी share करावं....

"मी म्हणतो मला माणसे कळतात..."  खरच का ?? 
आपल्याला भेटलेल्या अनेक व्यक्तींबद्दल आपली काही मते तयार होतात. ही मते त्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून, बोलण्यावरून आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या वागणुकीवरून तयार होतात.  
मग त्यांना आपण मित्र, शत्रू किंवा चांगला, बरा, वाईट माणूस म्हणून आपल्या मनाच्या ज्या त्या कप्प्यात बंदिस्त करून टाकतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीशी आपल्या प्रतिसादाच्या, वागण्याच्या पद्धती ठरवून टाकतो.   
आणि अचानक ... आपल्या मतांना, कल्पनांना छेद देऊन ती व्यक्ती अशी काही वागते की आपण अचंबित, आश्चर्यचकित होऊन जातो. 
हे अचंबित, आश्चर्यचकित होणे कधी आनंददायी तर कधी दु:खदायकही असू शकते. 
पण दोन्ही अर्थांनी आपल्या कल्पनांना, मतांना हादरा बसलेला असतो, हे मात्र नक्की.  
आणि आपल्याला पटते की आपले त्या व्यक्तीबद्दलचे अंदाज, अडाखे चुकीचे होते. 
आपल्याला जाणवते की, "... आपल्याला माणसं कळतात" ही आपली समजूत चुकीची होती किंवा निदान फारशी बरोबर नव्हती. 
प्रत्येक व्यक्तीला असा अनुभव आलेला असेलच, नव्हे असतोच. किंबहुना असे अनुभव रोजच्या रोज आपल्याला येतच असतात.

अशाच सर्वसामान्य माणसांची, त्यांच्या प्रसंगोपात्त वागण्याने आपल्याला दिलेल्या धक्क्यांनी, जाणीवांनी, अनुभवांनी जेंव्हा आपल्या मनात वादळ येऊन जाते ना .... तेंव्हा मन काहूरत... आणि कधी कधी आतूनच हुंदके देऊन रडतं.. आपल्या मनाचा तळ ढवळून काढणारा, आपल्या त्या व्यक्तीबद्दल मते बदलायला लावणारा किंवा बदलणारा असा तो मर्मस्पर्शी प्रसंग आला कि दुख चरचरतं...
        पण दुख कशाचं.... मी त्या व्यक्तीला नीट ओळखला नाही याचा.. कि त्या व्यक्तीने असा काही वागला याचं.... आता पुन्हा याच्यावर विचार सुरु....  पण काही हि म्हणा , एखाद्यावर जीव लावायच्या अगोदर अनेक वेळा विचार करा.... नाही तर, नंतर काही ठीक से घडलं नाही तर आपल्याच मनाला त्रास.. म्हणून घाबरून कुणावर जीव लावायचा सोडून द्यावा का...>>?? मी ता माझ्या जवळच्या प्रत्येकावर अतोनात जीव लावतो...
जीवनात प्रत्येकाशी एक छान सुंदर नातं जोडून अगदी छान जीवन जगावं. असा माझं साधा सोप्पा विचार आहे....काहीना माझे विचार आवडत नाहीत.. तर काही ना माझ्या छोट्या छोट्या खोडी आवडत नाहीत... तर काहीना मीच आवडत नाही... म्हणून मी स्वताला बदलायचं कि त्यांच्याशी नातंच ठेवायचा नाही...???

असे अनेक प्रश्न माझ्या मनात समुद्राच्या भारती आहोटी सारखे येत असतात... आहोटी खूपच कमी वेळा येते... नेहमी भरतीच असते..... असो.... मला असे अनेक प्रश्न पडतात.. तुलाहि पडतात का? असतील तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळून दे ना... 

पण मनाची दुसरी बाजू एकचं वाक्य सांगून जाते ...हे जीवन खूप सुंदर आहे... प्रत्येक अनुभवाचा आनंद घे... जीवन जग.....

म्हणून मी आज जगतो आहे.... या क्षणाला एकचं गाणं गावसं वाटतं ......
                                     अजीब दास्ता है ये.... कहा शुरू कहा खतम..
                                           ये मंझिले है कौनसी...
                                            ना वो समाज सके ना हम
                                      किसी के इतने पास हो
                                      कि सबसे दूर हो गये..
                                     अजीब दास्ता है ये.... कहा शुरू कहा खतम.

माझ्याही नकळत तुझ्याचसाठी लिहीलेल्या..

मी मोकळा असलो कि जुन्या आठवणी ताज्या करत असतो... आणि करायला हि हवा ना.... आठवणी ठेवायच्या कशाला मग... असाच मी एका रविवारी lappy वर किडे करत होतो, इतक्यात mobile  वर तिचा sms झळकला... मग gmail  वरच्या तिच्या फोल्डर मधील mail  वाचले.. मी तिला कित्येक mail  लिहून पाठवलेत.. मी तिचे केलेले वर्णन... माझ्या शब्दातून तिच्या आणि माझ्या भावनांची ओळख ... माझी कमी वेळात झालेली मैत्रीण... असे अनेक वर्णन तिच्याबद्दलचे , जेवढे करेल तेवढे कमीच आहे म्हणा..
       माझा मन वाहत होतं... आता हि वाहत.. कधी कधी माझं मन अनेक ठिकाणी फिरून येतं आणि अनेक विचाराने गुरफटून येतं आणि माझं मन त्याप्रमाणे पाझरत. माझ्या काही लिखाणाचा विषय हि तीच असते..
                           म्हणूनच ....
                                                त्या सर्व कविता, लेख 
                                                 माझ्याही नकळत 
                                              तुझ्याच साठी लिहिलेल्या

                                              मनाच्या पानापानातून 
                                            तुझ्या स्वभावांचे अनेक प्रकार 
                                            तुझ्या बद्दल माझ्या मनात 
                                             असलेला आकार, उकार..

                                            जर त्या तुझ्यापर्यंत पोहोचल्या तर?
                                           तर... तुझा माझ्यावर असलेला विश्वास ,
                                               तुझं मनमोकळ बोलणं ..
                                          हे जिवापलीकडे जपलेले सर्व काही 
                                           करेल आपल्या मैत्रीचा बंध घट्ट...

                                                   मला हि कळतंय ....
                                          तुझ्याशिवाय त्या कविता अपूर्ण
                                               आहेत आणि राहतील...
                                           जास्त मोलाचं काय आहे ?
                                            त्या रंगवलेल्या कविता?
                                                  कि तुझं असणं?
                                          माझ्यासाठी फक्त आणि फक्त 
                                               आपली निखळ मैत्री....

Sunday, October 17, 2010

जीवाची मुंबई

                           मी मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातला एका छोट्या गावातला... पण आम्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्याना आमच्या या भागाचा अभिमान फार ... पण मी गावात कधी राहिलोच नाही , वडिलांची सरकारी नोकरी असल्या मुळे आम्ही कधी कोंकण, मिरज ... असे बाहेरच राहिलो ...
         माझा जन्म कोकणात कणकवली इथे झाला, राणे साहेबांच्या मूळे कणकवली famous आहेच.. नंतर बालवाडीला मी तिलारी गोव्या जवळ कोकणातच होतो.  मग शाळेला कोयना आणि मिरज... college ला सांगली आणि सोलापूरला होतो.. नंतर काही दिवस सातारा आणि मग पुणे आता मुंबई... आहे कि नाही माझा चांगलाच महाराष्ट्र दर्शन .... मी असा खूप ठिकाणी राहिलो वेग वेगळे लोक पहिले.. कोकणातील लोक निवांत आणि खूप सध्या मनाचे ... 
         तसे मुंबई पण कोकणच म्हणे पण इथली लोक काही साधी आणि निवांत नाहीत... ती धक्काबुक्की च्या गर्दीत माझे हे दिवस काढतोय... माझ्या शिक्षणाचे पण असच मी जसा गोण बदललो तसे आहे.. engineering केलो electronics मध्ये, interest होतं designing- creativity मध्ये अनिनोकारी करतोय software मध्ये.. 
       असो ..  रोज office ९.४५ ते ६.४५ असते. मला घरून निघावा लागतं ८.२६ ला आणि परत येतो ७.५६ ला ऐकून माहित होतं मुंबई चे जीवन खूप fast असतंय आणि आता प्रत्यक्ष अनुभवतोय.. इथे सगळे मिनिटावर आणि सेकंदावर खेळ चालतो. माझी लोकल ८.३७ ला असते, मी ऑफिसला पोहचतो ९.१८ ला माझे काम चालू होते ९.२३ ला ... हे असच exact  मिनिटात बोलणे म्हणजे मुंबईचे जीवन.. नाही तर आमच्या गावाकडे ८.३७ म्हणजे अरे पाहुणे नऊला ट्रेन जा निवांत .... हे इथे चालत नाही.. 
       सकाळी छान tight इस्त्री केलेला shirt घालून ऑफिस ला जातो. पोहचलो कि wash room मध्ये जाऊन शिरत ताणून inshirt करायचा.. चुरगललेला shirt इस्त्रीचा आहे असा वाटावा म्हणून, आणि चुकून पण रुमाल विसरून गेलात म्हणजे तुमचे हालच हाल... मी तर म्हणतो रुमालपेक्षा टोवेलच घेऊन जावं, नाहीतर काय ... आंघोळ झाल्यावर आपण कधी रुमालाने अंग पुसतो का ? तशीच गत झालेली असते मुंबईच्या वातावरणात ...
       मुंबईतले लोक म्हणजे त्याहून भारी, मुंबईचे लोकल ट्रेन खूप famous आहे, ऑफिस time ला खूप गर्दी असते .. सकाळी ८.३० ते १०.30 संध्याकाळी ५.३० ते ७.३० full rush.. तुम्हाला ट्रेन मध्ये चढायचे असेल तर पोट भरून जेवण करून यायचा आणि जोरात दाबून ढकलत आत शिरायचं, नाहीतर तुम्ही कधीच ट्रेन मध्ये चढू शकणार नाही .. first class मध्ये थोडं बर असते .. अरे मी गर्दी बद्दल नाही बोलत, तिथे हि तेवढीच गर्दी असते फक्त लोक चांगले असतात.. आता तुम्ही म्हणाल general डब्यात लोक काही चांगले नसतात... तुम्हाला मुंबईच्या लोकांचा स्वभाव माहित नाही.. काही लोक भांडायलाच उभे असतात .. जरा धक्का लागला कि राडा चालू.. पण कधी त्यांच्याशी भांडायचं नाही, नाहीतर बाकीचे पण एकत्र येऊन भांडणाचे कारण माहित न करता चूक नसते त्यालाच बडवतात .. 
      ट्रेन मध्ये काहींची बसायची धडपड , काहींची फान खाली उभे रहायची धडपड तर काहींची दाराला उभे रहायची धडपड असते , आणि मी चढायला तर मिळतंय कि नाही , मिळालं तर उभारायला मिळतंय कि नाही एवढाच पाहत असतो..  मज्जा म्हणजे .. परवा ट्रेन मध्ये मला नशिबाने बसायला जागा मिळाली, मला जरा गड जिंकल्यासारखाच वाटलं... तुम्हाला तर माहीतच आहे मुंबईचे जीवन किती fast , तसल्या गर्दीत पण माझ्या शेजारी बसलेला कॉम्पुटर वर काही तरी काम करत होता.. मी थोडं डोकावून पहिलो.. त्यात काही तरी कॉम्पुटर security training बद्दल होतं.. मी पण आता web security testing करतोय ना, म्हणून उस्तुकतेने त्याला विचारलो..." तुम्हाला security बद्दल माहित आहे का? " तो माझ्यावर संतापला आणि म्हणाला, manners आहेत कि नाही.. दुसर्याच्या laptop मध्ये , कामात डोकावून बघतोस .... मी sorry म्हणालो आणि गप्प बसलो. 
      असाच एक किस्सा माझ्या ऑफिस मध्ये झाला, माझ्या डेस्कच्या मागे account section चे employee बसतात, जास्त करून सगळ्या मुलीच आहेत. त्यातल्या एका मुलीचे चुकून hello tune activate झाले होते, ती तिच्या मैत्रिणीला ओरडून सांगत होती, आणि airtel च्या नावाने बोंब मारत होती, माझे पण एकदा असे झाले होते, मी customer care ला फोन लाऊन ओरडून बंद करवला होतं आणि request वरून माझे पैसे पण refund झाले होते..म्हणून मी मदतीच्या नात्याने सांगायला गेलो , "तुम्ही त्यांना थोडं ओरडून सांगितलं तर refund पण होईल " पण तीच माझ्यावर खवळली आणि म्हणाली "दुसर्यांच्या गप्पा ऐकायला ऑफिस मध्ये येतोस काय..? काम कर..." मी sorry म्हणालो आणि गप्प बसलो. 
      काही लोक तर जास्तच बिनधास्त .. २ दिवस झाले होते मी कंपनी join करून , माझ्या team मध्ये   एक मुलगी आहे, २ दिवसात बोलता बोलता ती मला डार्लिंगच म्हणाली... आता मी काय म्हणू... ??
      हे असे लोक... असो मुंबईचा पाउस पण मुंबई सारखाच बर का ...!!!बाहेर जोरात पाउस पडत असेल पण आत चांगलाच घाम येईल...fan compalsory , मला वाटतंय मुंबई चे लोक लग्नाच्या हुंड्यात fan  च मागत असतील. 
      मुंबईत थोडा जरी जोरात पूस पडला कि लगेच गुडघा भर पाणी साठलाच म्हणून समजा.. मग आम्ही राजे आता पाउस चालू झाल्यापासून ऑफिसला जाताना चप्पल घालून जातो आणि तिथे गेल्यावर shoes . माझ्या bag मध्ये डब्बा, shoes , छत्री आणि deodorant (deodorant must आहे हं ...) यांनीच माझी bag भरलेली असते .. 
        माझा दिवस कधी चालू होतो आणि कधी संपतो काही काळतच नाही...........
                            अशी हि माझी जीवाची मुंबई..............

Sunday, August 1, 2010

तुझं हसणं

फांदीवरून उडावं स्वच्छंद पाखरू
निळ्या, मोकळ्या आभाळात
तसं तुझं हे हसणं.

तू हसलीस तेव्हा मी तुला म्हटलं,
" तुझ्यासाठी माझ्या मनात एक नाव आहे. "
तू विचारलंस, " कुठलं ? " 
मी म्हणालो, " फुलपाखरू " 
तू म्हणालीस, " मी आपली तीच बरी आहे;
इतकं कठीण नाव तुझ्या कवितेतच राहू दे. "
असं म्हणून तू हसलीस, अगदी तशीच.

नावबीव सगळं गेलं तुझ्या हसण्यात वाहून,
उरलं केवळ निळं मोकळं आभाळ,
आणि त्यात उडालेलं स्वच्छंद 
फुलपाखरू,
आणि आम्ही सगळे तुझ्या हसण्याकडे बघत
राहिलेले कावरू-बावरू .........
 

माझे मन...

                           मी लग्न करायचं तर घरच्यांच्या पसंतीनेच असं ठरवलं होतं. तुम्हाला वाटेल काय मनुष्य आहे हा! पण मी हा असाच...
आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपल्या सगळ्या मागण्या पुर्ण करतात. थोडक्यात आपणंच त्यांच सर्वस्व असतो. मग त्यांनी जर माझ्या कडून ही एक अपेक्षा ठेवली तर मी ती पुर्ण करायला नको? तुम्हीच सांगा. मी परस्पर एखादी मुलगी पसंत केली आणि ती घरच्यांच्या पसंतीस नाही उतरली, आयुष्यभर मनात हा सल राहणारच ना?  हा त्यांच्या भावनांचा अपमान नाही का? त्यामुळं सर्व संमतिनं मुलगी पसंत करायची असा सारांश. मुलीबद्दल काय अपेक्षा असायला हव्यात याचा मी नक्कीच कुणाला सल्ला विचारणार नव्हतो. मला माहिती आहे मी कसा आहे. माझ्यातले चांगले गुण आणि दुर्गुण ओळखण्याइतपत मी नक्कीच सुज्ञ आहे.
   आई शप्पथ!!! अरे आज लोकल मधून येताना शरद चा फोन आला होतं... बोलता बोलता सहज मला म्हणाला पाटील आता लग्न केंव्हा .... मग मी पण असाच विचार करू लागलो म्हटलं बघू तरी आपल्याला कसली मुलगी हवी  ......माझी मुलिंकडे बघायची नजरच बदलली. ऑफिसमधल्या, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या, घरच्यांसोबत असणाऱ्या, ग्रुप मध्ये असणाऱ्या मुली. कसा असतो त्यांचा स्वभाव? त्यांचे हावभाव, हसण्याची पद्धत, केस मागे घेण्याची लकब, कशा उठतात, कशा बसतात, कशा चालतात, बोटांचे गाडीच्या चावीशी, पेनाशी चाललेले खोडकर चाळे, दाताखाली ओठ दाबायची स्टाईल, हाताची घडी कशी घालतात, एकमेकांना टाळ्या देणे, बोलताना मध्येच डोळे मोठे करणे.. मुलींच्या सहज हालचाली टिपून घ्यायची सवयच लागली म्हणा ना! म्हटलं थोडातरी थांग पत्ता लागेल त्यांच्या स्वभावाचा! पण एव्हढं सोप्पं आहे का ते?
   कधी कधी आपली पण अपेक्ष प्रमाण बाहेर जाते...मग त्या क्रायटेरिया मध्ये बसणारी मुलगी शोधून सापडत नाही आणि पहिली बघितली जाते, मग दुसरी मग तिसरी असं करत करत मग मुलगी बघणे हा विनोद होउन बसतो. आणि नंतर वाटतं अरे यार तेव्हाच तिला हो म्हटलं असतं तर बर्र झालं असतं, पण तो पर्यंत वेळ टळून गेलेली असते.
   आणि हो मुलगी आवडलीच तर लग्न... तो एक खूप ackword सोहळा असतो... मला आवडतं पण......लग्नानंतर तिला जोब करायचा नसेल तर .... माझी काही हरकत नाही.. पण मी जर लांब कुठे तरी नोकरीला लागलो  channai सारख्या ठिकाणी तर.... तुम्हाला माहीतच आहे माझे नशीब ...मी हा असा मोठ्या कंपनीत काम करायला मिळतंय म्हणून घरापासून इतक्या लांब आलेलो, वेगळी भाषा, पुर्णपणे वेगळं कल्चर; राहणं खाणं, मेट्रो सिटी मध्ये रहायचं म्हणजे माझा एकट्याचाच कितीतरी खर्च व्हायचा. आणि मराठी मुली म्हणजे शक्यतो महाराष्ट्रातच शिक्षण आणि सहसा घरापासून जवळ नोकरी अशातल्या. सर्व काही स्थिर स्थावर आणि सासर पण सांगली , कोल्हापूर जयसिंगपूर , आपल्या भगतालाच असावं असं मनात ठेउन असणाऱ्या मुली घरापासून दोन हजार किलोमीटर दूर आल्या असत्या? येत असतीलही पण या सगळ्यावर पाणी फेरून एक्कलकोंड आयुष्य जगायला. नवरा दिवसभर ऑफिसमध्ये आणि ही घरात! सकाळी त्याला नाश्ता, डब्बा तयार करून द्यायचा; तो निघून गेला की धुणी भांडी करायची, घर साफसुफ करायचं, मग टीवी चालू करायचा त्यावर लागलेल्या मतीभ्र्ष्ट झालेल्या लोकांच्या, दर्शकांची बुद्धीभ्रष्ट करणाऱ्या मालिका, रटाळ सिनेमे, अन त्याचा कंटाळा आला की झोप काढायची. कारण अशा ठिकाणी शेजार  कसा भेटेल, असेल की नाही कुणास ठाउक? आणि नव्या ठिकाणी नोकरी करायची मानसिकता किती मुलींची असते या बाबत माझं काही स्प्ष्ट मत नाही. मग संध्याकाळी अर्धा तास नवरा घरी आला की त्याच्या सोबत भाजी वगैरे खरेदी करायला म्हणून बाहेर पडायचं, रात्री घरी यायचं स्वयंपाक पाणी, भांडी आवरायची झोपून जायचं.
   असो मी आणि माझे मन असाच भरकटत असतो..... माझे मन तर 160KM speed ने पळत असता... असे माझी मैत्रीण म्हणते...
          मी हा विचार लोकल मध्येच थांबवला आणि गुपचूप ऑफिस मध्ये येऊन काम करू लागलो ....