Sunday, January 22, 2012

मला माणसे कळतात... खरच का ??

माझं पाझरत मन .. आज असं काही पाझरू लागलंय ... वाटलं तुझ्याशी share करावं....

"मी म्हणतो मला माणसे कळतात..."  खरच का ?? 
आपल्याला भेटलेल्या अनेक व्यक्तींबद्दल आपली काही मते तयार होतात. ही मते त्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून, बोलण्यावरून आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या वागणुकीवरून तयार होतात.  
मग त्यांना आपण मित्र, शत्रू किंवा चांगला, बरा, वाईट माणूस म्हणून आपल्या मनाच्या ज्या त्या कप्प्यात बंदिस्त करून टाकतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीशी आपल्या प्रतिसादाच्या, वागण्याच्या पद्धती ठरवून टाकतो.   
आणि अचानक ... आपल्या मतांना, कल्पनांना छेद देऊन ती व्यक्ती अशी काही वागते की आपण अचंबित, आश्चर्यचकित होऊन जातो. 
हे अचंबित, आश्चर्यचकित होणे कधी आनंददायी तर कधी दु:खदायकही असू शकते. 
पण दोन्ही अर्थांनी आपल्या कल्पनांना, मतांना हादरा बसलेला असतो, हे मात्र नक्की.  
आणि आपल्याला पटते की आपले त्या व्यक्तीबद्दलचे अंदाज, अडाखे चुकीचे होते. 
आपल्याला जाणवते की, "... आपल्याला माणसं कळतात" ही आपली समजूत चुकीची होती किंवा निदान फारशी बरोबर नव्हती. 
प्रत्येक व्यक्तीला असा अनुभव आलेला असेलच, नव्हे असतोच. किंबहुना असे अनुभव रोजच्या रोज आपल्याला येतच असतात.

अशाच सर्वसामान्य माणसांची, त्यांच्या प्रसंगोपात्त वागण्याने आपल्याला दिलेल्या धक्क्यांनी, जाणीवांनी, अनुभवांनी जेंव्हा आपल्या मनात वादळ येऊन जाते ना .... तेंव्हा मन काहूरत... आणि कधी कधी आतूनच हुंदके देऊन रडतं.. आपल्या मनाचा तळ ढवळून काढणारा, आपल्या त्या व्यक्तीबद्दल मते बदलायला लावणारा किंवा बदलणारा असा तो मर्मस्पर्शी प्रसंग आला कि दुख चरचरतं...
        पण दुख कशाचं.... मी त्या व्यक्तीला नीट ओळखला नाही याचा.. कि त्या व्यक्तीने असा काही वागला याचं.... आता पुन्हा याच्यावर विचार सुरु....  पण काही हि म्हणा , एखाद्यावर जीव लावायच्या अगोदर अनेक वेळा विचार करा.... नाही तर, नंतर काही ठीक से घडलं नाही तर आपल्याच मनाला त्रास.. म्हणून घाबरून कुणावर जीव लावायचा सोडून द्यावा का...>>?? मी ता माझ्या जवळच्या प्रत्येकावर अतोनात जीव लावतो...
जीवनात प्रत्येकाशी एक छान सुंदर नातं जोडून अगदी छान जीवन जगावं. असा माझं साधा सोप्पा विचार आहे....काहीना माझे विचार आवडत नाहीत.. तर काही ना माझ्या छोट्या छोट्या खोडी आवडत नाहीत... तर काहीना मीच आवडत नाही... म्हणून मी स्वताला बदलायचं कि त्यांच्याशी नातंच ठेवायचा नाही...???

असे अनेक प्रश्न माझ्या मनात समुद्राच्या भारती आहोटी सारखे येत असतात... आहोटी खूपच कमी वेळा येते... नेहमी भरतीच असते..... असो.... मला असे अनेक प्रश्न पडतात.. तुलाहि पडतात का? असतील तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळून दे ना... 

पण मनाची दुसरी बाजू एकचं वाक्य सांगून जाते ...हे जीवन खूप सुंदर आहे... प्रत्येक अनुभवाचा आनंद घे... जीवन जग.....

म्हणून मी आज जगतो आहे.... या क्षणाला एकचं गाणं गावसं वाटतं ......
                                     अजीब दास्ता है ये.... कहा शुरू कहा खतम..
                                           ये मंझिले है कौनसी...
                                            ना वो समाज सके ना हम
                                      किसी के इतने पास हो
                                      कि सबसे दूर हो गये..
                                     अजीब दास्ता है ये.... कहा शुरू कहा खतम.

No comments:

Post a Comment