मित्रानो... एखादी मुलगी आपल्याला पाहताच आवडते... आणि मनातल्या मनात म्हणतो... "मुझे भी ऐसीही बिवी मिले.." आणि अशीच पाहताच आवडणारी मुलगी आपल्या सहवासात येते.. आणि आपण तिचे मान जिंकण्यासाठी, किंव्हा नकळत का होईना... आपण तिच्यासाठी बरेच काही करतो.... आणि आपली ती चांगली मैत्रीण होते.... पण आपलं मनात काही तरी त्याहीपेक्षा वेगळं चालू असतं.... आणि अचानक एके दिवशी ती आपल्या होणारया नवऱ्याला घेऊन भेटायला येते.... तेंव्हा मात्र काळीज चुरचुरत.. आणि असे काही शब्द कागदावर उमटतात....
हृदयी अनेक लाटा उठल्या तुझ्याचसाठी
ग्लानीत पापण्याही मिटल्या तुझ्याचसाठी
चाहूल लागता तव दरी वसंत फुलतो
केसातल्या कळ्याही हि फुलल्या तुझ्याचसाठी
दिसताच तू कुणाची लागेल दृष्ठ म्हणुनी
पणत्या घरातल्या बघ विझल्या तुझ्याचसाठी
केला जागी दिखावा मी धैर्यवान आहे
तिमिरात पापण्या या ओल्या तुझ्याचसाठी
आधी कधीच नव्हतो चोर मी या जागीच
पण काल चांदण्या मी लुटल्या तुझ्याचसाठी
हृदयात हुंदका हा दाबून ठेवलेला
ओठात हास्यरेषा फुलल्या तुझ्याचसाठी
mala vait vaatl mitra tuzyaasathi
ReplyDeletevaachlis gu maitrin hey tichyaasathi
anik ekti mulgi yeyil tuzyasaathi
tula ani prem hoyil tichyaasathi :D
chann aahe.. lihit raha... fudchi kavita mulgi milaali hya varun asude..
Khupach chaan...
ReplyDelete