Sunday, August 1, 2010

तुझं हसणं

फांदीवरून उडावं स्वच्छंद पाखरू
निळ्या, मोकळ्या आभाळात
तसं तुझं हे हसणं.

तू हसलीस तेव्हा मी तुला म्हटलं,
" तुझ्यासाठी माझ्या मनात एक नाव आहे. "
तू विचारलंस, " कुठलं ? " 
मी म्हणालो, " फुलपाखरू " 
तू म्हणालीस, " मी आपली तीच बरी आहे;
इतकं कठीण नाव तुझ्या कवितेतच राहू दे. "
असं म्हणून तू हसलीस, अगदी तशीच.

नावबीव सगळं गेलं तुझ्या हसण्यात वाहून,
उरलं केवळ निळं मोकळं आभाळ,
आणि त्यात उडालेलं स्वच्छंद 
फुलपाखरू,
आणि आम्ही सगळे तुझ्या हसण्याकडे बघत
राहिलेले कावरू-बावरू .........
 

1 comment:

  1. तुझा हसन अगदी आवडलं
    हसून माझ मन भरल
    पाखरू मला खूप आवडल
    रंगून मन खुश झाल
    मोकळ्या आभाळात आठवणी राहील
    ते तुझ्या प्रेमळ हसन

    कस वाटल तुझ्या मनातला भावनांची हसण्याची ओळख

    ReplyDelete